Saang Kaamini Sakhe Saajni

सांग कामिनी, सखे, साजणी
अगं, सांग कामिनी, सखे, साजणी
जादू काय केली?
सांग कामिनी, सखे, साजणी
जादू काय केली गं?

हिरवी मेहंदी तळहाताची
लाल कशी झाली गं?
हिरवी मेहंदी तळहाताची
लाल कशी झाली?

ऐक साजणा, मानमोहना
ऐक साजणा, मानमोहना
प्रीत तुझी जडली

रंग प्रीतीचा खुलला गाली
लाली हाती आली रे
रंग प्रीतीचा खुलला गाली
लाली हाती आली
ऐक साजणा, मानमोहना

उषा लाजता मनामध्ये का
रंग नभी खुलतो?
लांडोरीच्या तालावरती
मोर कसा डुलतो

अगं, प्रेमरंग हा सर्व उषेचा
प्रेमरंग हा सर्व उषेचा
नभातच विरतो

नाच नाचता मोर-लांडोरी
गर्भ नवा जुळतो गं
नाच नाचता मोर-लांडोरी
गर्भ नवा जुळतो
सांग कामिनी, सखे, साजणी

गोऱ्या गाली हनुवटीखाली
काय सांगतीय?
गालावरची खळी मनाला
घालते का खीळ?

राधा गाली पाहुनी तीळ
राधा गाली पाहुनी तीळ
भुले घन नीळ

गालावरची खळी खुलविते
संसार मेळ रे
गालावरची खळी खुलविते
संसार मेळ रे
सांग कामिनी, सखे, साजणी

२७ नक्षत्र नभी ती गीत काय गाती?
मृग मोठा की स्वाती मोठी सांग एकांती
(नाही बाई काहीच अटपत नाही, काय करू?)

अगं, शिंपल्यात त्या स्वातीजलाचे
शिंपल्यात त्या स्वातीजलाचे
मोतीच होती

मृगनक्षत्र श्रेष्ठ ह्या जगी
अन्न मिळे कोटी गं
मृगनक्षत्र श्रेष्ठ ह्या जगी
अन्न मिळे कोटी
ऐक कामिनी, सखे, साजणी



Credits
Writer(s): Raam Laxman, Anant Jadhav
Lyrics powered by www.musixmatch.com

Link