Ek Lajara Na Sajara Mukhda

एक लाजरान साजरा मुखडा
चंद्रावानी फुलला गं
एक लाजरान साजरा मुखडा
चंद्रावानी फुलला गं

राजा मदन हसतोय कसा
कि जीव माझा भुलला गं
ह्या एकांताचा तुला
इशारा कळला गं

लाज आडवी येती मला
कि जीव माझा भुलला गं
नको राणी, नको लाजू
लाजंमदी नको भिजू

हितं नको, तितं जाऊ
आडोशाला उभ ऱ्हाऊ
का? बघत्यात

एक लाजरान साजरा मुखडा
चंद्रावानी फुलला गं
राजा मदन हसतोय कसा
कि जीव माझा भुलला गं

रेशीम विळखा घालुन, सजना
नका हो कवळुन धरू, का?
लुकलुक डोळं करुन भोळं
बघतंय फुलपाखरू

कसा मिळावा पुन्हा
साजणी, मौका असला गं?

लाज आडवी येती मला
कि जीव माझा भुलला गं
नको रानी, नको लाजू
लाजंमदी नको भिजू

हितं नको, तितं जाऊ
आडोशाला उभ ऱ्हाऊ
का? बघत्यात

एक लाजरान साजरा मुखडा
चंद्रावानी फुलला गं
एक लाजरान साजरा मुखडा
चंद्रावानी फुलला गं

राजा मदन हसतोय कसा
कि जीव माझा भुलला गं
राजा मदन हसतोय कसा
कि जीव माझा भुलला गं

बेजार झाले सोडा सजणा
शिरशिरी आली अंगा, का?
मधाचा ठेवा लुटता-लुटता
बघतोय चावट भुंगा

मनात राणी तुझ्या
कशाचा झोका झुलला गं?

लाज आडवी येती मला
कि जीव माझा भुलला गं
नको रानी, नको लाजू
लाजंमदी नको भिजू

नको रानी, नको लाजू
लाजंमदी नको भिजू

हितं नको, तितं जाऊ
आडोशाला उभ ऱ्हाऊ
हितं नको, तितं जाऊ
आडोशाला उभ ऱ्हाऊ
का? बघत्यात

एक लाजरान साजरा मुखडा
चंद्रावानी फुलला गं
एक लाजरान साजरा मुखडा
चंद्रावानी फुलला गं

राजा मदन हसतो कसा
कि जीव माझा भुलला गं
राजा मदन हसतो कसा
कि जीव माझा भुलला गं



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Ram Kadam
Lyrics powered by www.musixmatch.com

Link