Hirva Shalu Hairvi Choli

हिरवा शालू, हिरवी चोळी
हिरवा चुडा मी ल्याले
लाज लाजून मी गोरी-मोरी झाले गं
गोरी-मोरी झाले

(लाज लाजून मी गोरी-मोरी झाले गं)
(गोरी-मोरी झाले)

जोडीनं बसता लग्नाला
मांडी लागली मांडीला
जोडीनं बसता लग्नाला
मांडी लागली मांडीला

चटकन (उई)
चटकन त्याने चिमटा काढला
बावरून मी गेले
(अगं, बाई, बाई, बाई, बाई)

लाज लाजून मी गोरी-मोरी झाले गं
गोरी-मोरी झाले
(लाज लाजून मी गोरी-मोरी झाले गं)
(गोरी-मोरी झाले) हिरवा शालू

रंग खेळता हातानं
विडा तोडता दातानं
रंग खेळता हातानं
विडा तोडता दातानं

कचकन (आई गं)
कचकन त्याने ओठ चावला
अंग शहारुन आले
(अगं, बाई, बाई, बाई, बाई)

लाज लाजून मी गोरी-मोरी झाले गं
गोरी-मोरी झाले
(लाज लाजून मी गोरी-मोरी झाले गं)
(गोरी-मोरी झाले) हिरवा शालू

पहिल्या राती मी रंगात
चंदनाची चोळी अंगात
पहिल्या राती मी रंगात
चंदनाची चोळी अंगात

गपकन, हा
गपकन त्याने मीठी मारता
शिनगारात मी न्हाले
(अगं, बाई, बाई, बाई, बाई)

लाज लाजून मी गोरी-मोरी झाले गं
गोरी-मोरी झाले
(लाज लाजून मी गोरी-मोरी झाले गं)
(गोरी-मोरी झाले)

हिरवा शालू, हिरवी चोळी
हिरवा चुडा मी ल्याले
लाज लाजून मी गोरी-मोरी झाले गं
गोरी-मोरी झाले



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Ram Kadam
Lyrics powered by www.musixmatch.com

Link