Dhundit Gandhit Houni Sajna

धुंदीत, गंधित होऊनी, सजणा
प्रीतीत रंगुनी जाऊया
धुंदीत, गंधित, होऊनी, सजणा
प्रीतीत रंगुनी जाऊया

छेडित ये प्रीत संगीत, सजणा
प्रीतीत रंगुनी जाऊया, ये सजणा

कुंजात या गंधलेली फुले माळुनी जाई झुले, हा
कुंजात या गंधलेली फुले माळुनी जाई झुले, हा
गंधात ही धुंद झाली चमेली गुलमोहराला भुले, हा
हा-हा, तुझी सखी तुझ्यासवे ही

धुंदीत, गंधित होऊनी, सजणा
प्रीतीत रंगुनी जाऊया, ये सजणा

पानातुनी रेशमी चांदणे हे मोहूनी येई करी, हा
पानातुनी रेशमी चांदणे हे मोहूनी येई करी, हा
गाण्यातले सूर हे अमृताचे दाटुनी आले उरी, हा
हा-हा, अशी घडी युगा-युगाची

धुंदीत, गंधित होऊनी, सजणा
प्रीतीत रंगुनी जाऊया
छेडित ये प्रीत संगीत, सजणा
प्रीतीत रंगुनी जाऊया



Credits
Writer(s): Shantaram Nandgaokar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link