Uthi Govinda Uthi Gopala

उषःकाल झाला

उठी गोविंदा, उठी गोपाळा...
उठी गोविंदा, उठी गोपाळा, उषःकाल झाला
हलके-हलके उघड राजीवा, नील नेत्रकमला
उठी गोविंदा, उठी गोपाळा...
तुझ्यापरी बघ जीवन वारा
मिठी मारतो प्राजक्ताला
तुझ्यापरी बघ जीवन वारा
मिठी मारतो प्राजक्ताला

धवल केसरी मृदुल सुमांचा
पाऊस अंगणी झिमझिमला
उठी गोविंदा, उठी गोपाळा...
पर्णपोपटी हिंदोळ्यावर
कंठ फुटतो आनंदाला

तुज भूपाळी आळवित सुंदर
चढली गगनी विहंगमाला
उठी गोविंदा, उठी गोपाळा...
गोठ्यामधले मुके लेकरू
पीत झुरूझुरु कामधेनूला
गोठ्यामधले मुके लेकरू
पीत झुरूझुरु कामधेनूला

किती आवरु भरला पान्हा
हसवी अरुणा तंव आईला
उठी गोविंदा, उठी गोपाळा, उषःकाल झाला
हलके-हलके उघड राजीवा, नील नेत्रकमला
उठी गोविंदा, उठी गोपाळा...



Credits
Writer(s): Vasant Prabhu, P. Savalaram
Lyrics powered by www.musixmatch.com

Link