Maage Pudhe Paahate

मागे-पुढे पाहते
रचिते भविष्य काही
होणार काय आहे?
ते मात्र ज्ञात नाही

स्वर शब्दरूप होती
स्वर शब्दरूप होती

स्वर शब्दरूप होती
स्वर शब्दरूप होती
आनंदल्या मनाचे
स्वर शब्दरूप होती
आनंदल्या मनाचे

गाते परि कळे ना
गाते परि कळे ना
हे गीत जीवनाचे
स्वर शब्दरूप होती
स्वर शब्दरूप होती

आनंद-दुःख यांचे
आनंद-दुःख यांचे
नाते मुळी जुळे ना
ओठांवरील माझ्या
गाणे तरी ठरे ना

सुखदायी गीत होते
साऱ्याच भावनाचे
स्वर शब्दरूप होती
स्वर शब्दरूप होती

माझ्याच गायनी मी
माझ्याच गायनी मी
लयधुंद होत जाते
गाण्यास रागिणीचा
हळुवार रंग देते

वाजे प्रसन्न वीणा
उत्फुल्ल ताल नाचे
स्वर शब्दरूप होती
स्वर शब्दरूप होती

आनंदल्या मनाचे
गाते परि कळे ना
हे गीत जीवनाचे
स्वर शब्दरूप होती
स्वर शब्दरूप होती



Credits
Writer(s): Hridaynath Mangeshkar, G D Madgulkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link