Khulya Khulya Re

खुळ्या-खुळ्या रे पावसा
किती भिजविसी मला?

खुळ्या-खुळ्या रे पावसा
किती भिजविसी मला?
खुळ्या-खुळ्या रे पावसा
किती भिजविसी मला?

नाही-नाही म्हणताना
मी ही कवळीले तुला
हा, खुळ्या-खुळ्या रे पावसा
किती भिजविसी मला?

कसा वाहे गार वारा
अंग सारे थरथरे
कसा वाहे गार वारा
अंग सारे थरथरे

त्यात तुझा अनावर
वरतुनी हात फिरे
त्यात तुझा अनावर
वरतुनी हात फिरे

नाही-नाही म्हणताना
मी ही कवळीले तुला
खुळ्या-खुळ्या रे पावसा
किती भिजविसी मला?

कुठे जाऊ, धाऊ कुठे?
आता पुरती भिजले
कुठे जाऊ, धाऊ कुठे?
आता पुरती भिजले

धुंद धारांच्या छतात
बाई, अखेरी लपले
अरे, धुंद धारांच्या छतात
बाई, अखेरी लपले

नाही-नाही म्हणताना
मी ही कवळीले तुला
खुळ्या-खुळ्या रे पावसा
किती भिजविसी मला?

हो, खुळ्या-खुळ्या रे पावसा
किती भिजविसी मला?
खुळ्या-खुळ्या रे पावसा
किती भिजविसी मला?



Credits
Writer(s): Hridaynath Mangeshkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link