Halu Halu Kuna Na Deta Kalu (From "Mukkam Post Dhanori")

कळी उमलुनी फुलले यौवन
चढला ज्वाणीचा बहर
अंग-अंग मी केले जतन
लूटी नयनांनी चितकोर

हळू-हळू कुणा न देता कळू, शोधा रावजी
काळजात दडलिया किल्ली यौवणाची
कोडे हे जेव्हा तुम्हा सुटेल, राया

अवचित तुमच्या हाती पडेल, राया
अवचित तुमच्या हाती पडेल दौलत ज्वाणीची
फळेल आस ही मिलनाची
हळू-हळू कुणा न देता कळू, शोधा रावजी
काळजात दडलिया किल्ली यौवणाची

अंधारी या भयाण राती डाव मांडला जुल्मी, राया
...डाव मांडला जुल्मी
जपून चला जरा धीर धरा एक घाव बसू द्या वर्मी
...एक घाव बसू द्या वर्मी
सुटे तंव गाठ अंतरीची, गवसलं दौलत ज्वाणीची

हळू-हळू कुणा न देता कळू, शोधा रावजी
काळजात दडलिया किल्ली यौवणाची

जहरी नजर तुझी, सख्या रे, सख्या रे
सख्या मला डसते
भेदून छाती उरात शिरून नसात विष भरते
अंग-अंग कळवळून घालते साद प्रणयाची
करेल पुरती आस मनीची रात्र पौर्णिमेची

हळू-हळू कुणा न देता कळू, शोधा रावजी
काळजात दडलिया किल्ली यौवणाची

नकोस फटकू दाही दिशांना शोध जरा घे मनी
राया, झाक जरा अंतरी
मोहजाल हे शृंगाराचे छेदून मिळवा किल्ली
राया, स्वर्ण वेध घेऊनि लूटा ही दौलत ज्वाणीची
घालते साद मी प्रणयाची

हळू-हळू कुणा न देता कळू, साजणाजी
या खुशाल दौलत लूटा यौवणाची
काळजातली बंद कवाडे, राया
अवचित उघडून तुम्ही मिळवली...
अवचित उघडून तुम्ही मिळवली दौलत ज्वाणीची
रंगु दे रास ही मिलनाची

हळू-हळू कुणा न देता कळू, साजणाजी
या खुशाल दौलत लूटा यौवणाची



Credits
Writer(s): Kumar Gavda, Yugandhar Deshmukh
Lyrics powered by www.musixmatch.com

Link