Tarun Aahe Ratra Ajunahi (From "Anvatt")

तरुण आहे रात्र अजुनी
राजसा निजलास का रे?
तरुण आहे रात्र अजुनी
राजसा निजलास का रे?

राजसा निजलास का रे?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे?
तरुण आहे रात्र अजुनी

अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला
अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला
अजुन मी विझले कुठे रे? हाय! तू विझलास का रे?

राजसा निजलास का रे?
तरुण आहे रात्र अजुनी

सांग, ह्या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू?
सांग, ह्या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू?
उमलते अंगांग माझे आणि तू मिटलास का रे?

राजसा निजलास का रे?
तरुण आहे रात्र अजुनी
राजसा निजलास का रे?

राजसा निजलास का रे?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे?

तरुण आहे रात्र अजुनी

Credits
Writer(s): Pt. Hridaynath Mangeshkar, Traditional
Lyrics powered by www.musixmatch.com

Link