Gaar Waara Ha Bharara (From "Gaarva")

पाणी झरत चालले, आज आभाळ फाटले
पावसाला पावसाने वर ढगात गाठले
पाणी झरत चालले, झाड झाडाच्या मीठीत
आता झाडाच्या भवती रान आगीच्या धगीत

पाणी झरत चालले, नदी सागर भरती
वाळू ओलावली सारी दोन्ही किनाऱ्यावरती
पाणी झरत चालले, उभ्या रानाला तहान
पाणी झरत चालले, उभ्या रानाला तहान
आता किलबिलताहे झाडा-झाडांतून पान

पाणी झरत चालले, आज आभाळ फाटले
पाणी झरत चालले, आज आभाळ फाटले
पावसाला पावसाने वर ढगात गाठले

गार वारा हा भरारा, नभ टिपूस-टिपूस
गार वारा हा भरारा, नभ टिपूस-टिपूस
रानी-वनी, पानो-पानी...
रानी-वनी, पानो-पानी मन पाऊस-पाऊस
गार वारा हा भरारा...

सा रे ध स प ध ग रे

मातीखाली खोल-खोल ओल मातीच्या मनास
मातीखाली खोल-खोल ओल मातीच्या मनास
मातीवर थरथरे...
मातीवर थरथरे ओला सुवास-सुवास

गार वारा हा भरारा, नभ टिपूस-टिपूस
गार वारा हा भरारा...

पावसाळी पायवाटा जरा उदास-उदास
पावसाळी पायवाटा जरा उदास-उदास
दाही दिशांत पाखरे...
दाही दिशांत पाखरे जणू आभास-आभास

गार वारा हा भरारा, नभ टिपूस-टिपूस
गार वारा हा भरारा...

नी धा म, म स नी, नी ग रे

रान मोकळे-मोकळे...
रान मोकळे-मोकळे बघे भारुन नभास
रान मोकळे-मोकळे बघे भारुन नभास
त्याचा हिरवा-हिरवा...
त्याचा हिरवा-हिरवा आज प्रवास-प्रवास

गार वारा हा भरारा, नभ टिपूस-टिपूस
गार वारा हा भरारा, नभ टिपूस-टिपूस
रानी-वनी, पानो-पानी...
रानी-वनी, पानो-पानी मन पाऊस-पाऊस
गार वारा हा भरारा...



Credits
Writer(s): Saumitra, Milind Ingle
Lyrics powered by www.musixmatch.com

Link