Raya Sodana Bangadi Tichakal

साऱ्या समोर, भलत्याच वक्ती
नका करू हो माझ्याशी मस्ती
राया, सोडा ना, हात सोडा ना
बांगडी टीचकलं, माझं मनगट पिचकलं
बांगडी टीचकलं, माझं मनगट पिचकलं

मी नुकतीच वयात आले
तरण्या डोळ्याची शिकार झाले
मी नुकतीच वयात आले
तरण्या डोळ्याची शिकार झाले

अन इश्काच्या जाळ्यात फसले
जाळ्यात फसले
खरी नाही तुमची लाडी-गोडी
पुरी झाली हो, छेडाछेडी

राया, सोडा ना, हात सोडा ना
बांगडी टीचकलं, माझं मनगट पिचकलं
बांगडी टीचकलं, माझं मनगट पिचकलं

तनू शेलाटी नाजूक, राया
तंग का चोळी कचते काया
तनू शेलाटी नाजूक, राया
हो, तंग का चोळी कचते काया

माझं अंग हळदीचा गाभा, हळदीचा गाभा
नका मारू हो, गाली टिचकी
माझ्या उरात भरली धडकी

राया, सोडा ना, हात सोडा ना
बांगडी टीचकलं, माझं मनगट पिचकलं
बांगडी टीचकलं, माझं मनगट पिचकलं



Credits
Writer(s): Daddy Deshmukh, Vishvanath More
Lyrics powered by www.musixmatch.com

Link