Tumcha Naav Gaav Kaay

तुमचं नाव-गाव काय...
हा, तुमचं नाव-गाव काय सांगा की हो, पाव्हनं?
तुमचं नाव-गाव काय सांगा की हो, पाव्हनं?

कवा पासनं चाललंय तुमचं...
हो, कवा पासनं चाललंय तुमचं (काय?)
डाव्या डोळ्याची पापणी लावणं
अहो पाव्हनं, तुमचं नाव-गाव काय
सांगा की हो, पाव्हनं? (सांगू काय?)

आला हंगाम खुललंय रान
टंच्च कंसात भरलंय दानं (अस्सं का)
आला हंगाम खुललंय रान
टंच्च कंसात भरलंय दानं

फिरफिरून पाखरावानी, hmm
इथं गिरट्या घालतंय कोणी (कोण?)
फिरफिरून पाखरावानी
इथं गिरट्या घालतंय कोणी

बरं दिसतं का हे सांजचं
हो, बरं दिसतं का हे सांजचं (काय?)
भरल्या पिकात धुडकूस घालणं
अहो पाव्हनं, तुमचं नाव-गाव काय
सांगा की हो, पाव्हनं?

नव्या नवतीची हिरवीगार
शेंग चवळीची झाली बेजार, (अगं बया)
नव्या नवतीची हिरवीगार
शेंग चवळीची झाली बेजार

कवळ्या पानाच्या पदराखाली, hmm
किती करू तिची रखवाली (असं)
कवळ्या पानाच्या पदराखाली
किती करू तिची रखवाली

मला भलतंच जातंय भारी
हो, मला भलतंच जातंय भारी (काय?)
वाण गावरान माझा राखण
अहो पाव्हनं, तुमचं नाव-गाव काय
सांगा की हो, पाव्हनं?

कवा पासनं चाललंय तुमचं...
हो, कवा पासनं चाललंय तुमचं (काय?)
डाव्या डोळ्याची पापणी लावणं
अहो पाव्हनं, तुमचं नाव-गाव काय
सांगा की हो, पाव्हनं?



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Vishwanath More
Lyrics powered by www.musixmatch.com

Link