Tuze Ni Maze Evale Gokul

तुझे नि माझे इवले गोकुल
इवले गोकुल
दूर आपुले वसवू घरकुल
दूर आपुले वसवू घरकुल

घरट्यापुढती बाग चिमुकली
बाग चिमुकली
जाईजुईच्या प्रसन्न वेली
जाईजुईच्या प्रसन्न वेली

कोठे मरवा, कुठे मोगरा
कोठे मरवा, कुठे मोगरा

सतत उधळीतो सुगंध शीतल
सतत उधळीतो सुगंध शीतल
दूर आपुले वसवू घरकुल
दूर आपुले वसवू घरकुल

त्या उद्यानी सायंकाळी
सुवासिनी तू सुमुख सावळी

वाट पाहशील निज नाथाची
वाट पाहशील निज नाथाची

अधीरपणाने घेशील चाहूल
अधीरपणाने घेशील चाहूल
दूर आपुले वसवू घरकुल
दूर आपुले वसवू घरकुल

चंद्र जसा तू येशील वरती
येशील वरती
मी डोळ्यांनी करीन आरती

नित्य नवी ती भेट आपुली
नित्य नवी ती भेट आपुली

नित्य नवा तो प्रमोद निर्मल
नित्य नवा तो प्रमोद निर्मल
दूर आपुले वसवू घरकुल
दूर आपुले वसवू घरकुल



Credits
Writer(s): Dutta Davjekar, G D Madgulkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link