Ek Hota Chimana

एक होता चिमणा, एक होती चिमणी
एक होता चिमणा, एक होती चिमणी
नांदुरकीच्या झाडावर त्यांची झाली ओळख ते
नांदुरकीच्या झाडावर त्यांची झाली ओळख ते

एक होता चिमणा, एक होती चिमणी
चिमणा म्हणाला चिमणीला, काय? "आपण बांधू घरटं एक"
चिमणा म्हणाला चिमणीला, "आपण बांधू घरटं एक"

चिमणी काही बोले ना, जाग्यावरची हाले ना
चिमणा म्हणाला, "येशील ना, माझी मैत्रिण होशील ना?"
चिमणा म्हणाला, "येशील ना, माझी मैत्रिण होशील ना?"
चिमणी म्हणाली भीत-भीत, काय?
"मला किनई पंख नाहीत"

मग चिमणा काय म्हणाला?
"नसोत पंख नसले तर, दोघे मिळून बांधू घर"
"दोघे मिळून बांधू घर"
"नसोत पंख नसले तर, दोघे मिळून बांधू घर"

चिमणा गेला कामावर, चिमणी बसली झाडावर
चिमणा आला झाडावर, परत, हो मिळकत घेऊन स्वत:ची
चिमणा आला झाडावर मिळकत घेऊन स्वत:ची
कसली गं मिळकत?

एक कण धान्याचा, एक काडी गवताची
एक कण धान्याचा, एक काडी गवताची
काड्या-काड्या सांधून, घरटं काढलं बांधून
काड्या-काड्या सांधून, घरटं काढलं बांधून

नांदुरकीच्या फांदीवर झुलू लागलं सुंदरसं घर, सुंदरसं घर
एके दिवशी अघटित घडले, चिमणीलाही पंख फुटले
Hey, चिमणीलाही पंख फुटले

चिमणा झाला राजा, चिमणी झाली राणी
चिमणा झाला राजा, चिमणी झाली राणी
एक होता चिमणा, एक होती चिमणी
एक होता चिमणा, एक होती चिमणी



Credits
Writer(s): Dutta Davjekar, G D Madgulkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link