Shabd Shabd Julavuni

शब्द-शब्द जुळवुनी वाचीते तुझ्या मना
शब्द-शब्द जुळवुनी वाचीते तुझ्या मना
आवरु किती गडे, धीर नाही लोचना
शब्द-शब्द जुळवुनी वाचीते तुझ्या मना

अजाणतेपणी कुणी मला कुणास वाहिले
अजाणतेपणी कुणी मला कुणास वाहिले
असेल देव तो तरी, मी न त्यास पाहिले

आंधळी कळी खुळी, आ
आंधळी कळी खुळी मजसी काय कल्पना
शब्द-शब्द जुळवुनी वाचीते तुझ्या मना

उघडताच पाकळी लाभली तुझी दिठी, तुझी दिठी
उघडताच पाकळी लाभली तुझी दिठी, तुझी दिठी
तुजसी देव मानुनी घातली गडे मिठी

नितीपाठ ओरडे, आ
नितीपाठ ओरडे हीच पापवासना
शब्द-शब्द जुळवुनी वाचीते तुझ्या मना
शब्द-शब्द जुळवुनी वाचीते तुझ्या मना

आवरु किती गडे, धीर नाही लोचना
शब्द-शब्द जुळवुनी वाचीते तुझ्या मना



Credits
Writer(s): Dutta Davjekar, G D Madgulkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link