Jay Jay Maharashtra Majha

(महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा)
(गर्जा महाराष्ट्र माझा)

जय-जय महाराष्ट्र माझा
गर्जा महाराष्ट्र माझा
(जय-जय महाराष्ट्र माझा)
(गर्जा महाराष्ट्र माझा)

(जय-जय महाराष्ट्र माझा)
(गर्जा महाराष्ट्र माझा)

रेवा-वरदा, कृष्ण-कोयना, भद्रा-गोदावरी
रेवा-वरदा, कृष्ण-कोयना, भद्रा-गोदावरी
एक पणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
एक पणाचे भरती पाणी मातीच्या घागरी

भीमथडीच्या तट्टांना या (तट्टांना या)
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा

(जय महाराष्ट्र माझा)
(जय-जय महाराष्ट्र माझा)
(गर्जा महाराष्ट्र माझा)

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो (सिंह गर्जतो, सिंह गर्जतो)
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा
दरी-दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

(जय-जय महाराष्ट्र माझा)
(गर्जा महाराष्ट्र माझा)

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी

दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा

(जय-जय महाराष्ट्र माझा)
(गर्जा महाराष्ट्र माझा)
जय-जय महाराष्ट्र माझा



Credits
Writer(s): Raja Badhe, Shrinivas Khale
Lyrics powered by www.musixmatch.com

Link