Paul Thakla Nahi

रखरखत्या रानातून
थोडं पुढं जाऊ, गड्या
पाऊल थकलं न्हाई, गड्या
पाऊल थकलं न्हाई...

सुखलेल्या भाकरीला
पाण्यासंग खाऊ, गड्या
पाऊल थकलं न्हाई, गड्या
पाऊल थकलं न्हाई...

झालो बरबाद जरी
बसला घाव उरी
कलेची आग सारं
जाळून बी जाई ना

अडला घास असा
का वनवास असा?
पण ह्यो ध्यास अजून बी
मागं ऱ्हाई ना

फिरला त्यो वासा घर
फिरलं न्हाई, गड्या
पाऊल थकलं न्हाई, गड्या
पाऊल थकलं न्हाई...

रखरखत्या रानातून
थोडं पुढं जाऊ, गड्या
पाऊल थकलं न्हाई, गड्या
पाऊल थकलं न्हाई...

काळ रात आली तरी
पडलं सपान रं
डोळ्यामंदी पाणी तरी
गळ्यामंदी गाण रं

त्याचा हात पाठीवर
सोनियाची खाण रं
शरमेनं न्हाई कधी
झुकली मान रं

हात पसरून, गड्या
सुख येत न्हाई रं
डोळं झाक करून बी
दुःख जात न्हाई रं

नशिबाचं भोग कुणा
चुकलं न्हाई, गड्या
पाऊल थकलं न्हाई, गड्या
पाऊल थकलं न्हाई...

रखरखत्या रानातून
थोडं पुढं जाऊ, गड्या
पाऊल थकलं न्हाई, गड्या
पाऊल थकलं न्हाई...

झालो बरबाद जरी
बसला घाव उरी
कलेची आग सारं
जाळून बी जाई ना

अडला घास असा
का वनवास असा?
पण ह्यो कास अजून बी
मागं ऱ्हाई ना

सुखलेल्या भाकरीला
पाण्यासंग खाऊ, गड्या
पाऊल थकलं न्हाई, गड्या



Credits
Writer(s): Atul Gogavale, Ajay Gogavale
Lyrics powered by www.musixmatch.com

Link