Mi Tar Hoin Chandani

मी तर होईन चांदणी अतीच उंच गगनी
मी तर होईन चांदणी अतीच उंच गगनी
तिथं तू कैसा येशील रं? तुझी-माझी भेट कैसी रं?
तुझी-माझी भेट कैसी रं? तुझी-माझी भेट कैसी रं?

तू तर होशील चांदणी, मी तर होईल पाखरू
चंद्राला घिरट्या घालीन गं आणि मग तुला मी भेटेन गं
आणि मग तुला मी भेटेन गं, आणि मग तुला मी भेटेन गं

मी तर होईन पाडाचा आंबा, साखर चुंबा देईन रं
तिथं तू कैसा येशील रं? तुझी-माझी भेट कैसी रं?
तुझी-माझी भेट कैसी रं? तुझी-माझी भेट कैसी रं?

मी तर होईन पोपट-राघू, आंबा न आंबा पाडीन गं
फांदी न फांदी जोडीनं गं आणि मग तुला मी भेटेन गं
आणि मग तुला मी भेटेन गं, आणि मग तुला मी भेटेन गं

मी तर होईन मासोळी समुद्रातळी राहीन रं
तिथं तू कैसा येशील रं? तुझी-माझी भेट कैसी रं?
तुझी-माझी भेट कैसी रं? तुझी-माझी भेट कैसी रं?

मी तर कोळी होईन आशाजाळ टाकीन गं
त्यामध्ये तुलाच पकडीन गं, तळमळ-तळमळ करशील गं
तळमळ-तळमळ करशील गं आणि मग तुला मी भेटेन गं
आणि मग तुला मी भेटेन गं, आणि मग तुला मी भेटेन गं

(तुझी-माझी भेट होईल रं)
आणि मग तुला मी भेटेन गं (तुझी-माझी भेट होईल रं)

आणि मग तुला मी भेटेन गं

Credits
Writer(s): Ajay Gogavale, Atul Gogavale, Bhanumati Sable
Lyrics powered by www.musixmatch.com

Link