Takmak Takmak Baghu Nako

टकमक-टकमक बघू नका हो
बोला-बोला गोडीनं
अगं, राघू-मैनेवानी चल राघू जोडीने
गं, राघू-मैनेवानी चल राघू जोडीने

टकमक-टकमक बघू नका हो
अहो, बोला गोडीनं
हो, बोला-बोला गोडीनं

असा बहाणा नुसता हो
लबाड बारी दिसता हो
लपून-छपून का बसता हो?
नजर राखूनी हसता हो

लई, लई, लई
लई मज्जा आलीया
अशा छेडा-छेडीने

अगं, राघू-मैनेवानी चल राघू जोडीनं
टकमक-टकमक बघू नका हो
अहो, बोला गोडीनं
हा, बोला-बोला गोडीनं

मनातलं ते कळलं गं
तुझ्या संगती वळलो गं
म्हणून मन हे भुललं हो
म्हणून मन हे भुललं हो
वाऱ्यानं फुल हे खुललं हो

नको, नको, नको
नको अशी भेट ही
चल जाऊ ओढीनं

अगं, राघू-मैनेवानी चल राघू जोडीनं, जोडीनं
राघू-मैनेवानी चल राघू जोडीनं
टकमक-टकमक बघू नका हो
अहो, बोला गोडीनं
हा, बोला-बोला गोडीनं



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link