Kavra Bavra Hotoya

कावरा-बावरा होतोया, हो-हो-हो
मला बघून हसतोया, हो-ओ
कावरा-बावरा होतोया
मला बघून हसतोया

हो, कसं पिरतीचं जाळ विनू गं?
माझ्या बावळट गणोबाला काय म्हणू गं?
माझ्या बावळट गणोबाला काय म्हणू गं?

जवळ-जवळ जाईन तसा दूर जातोया
टुकू-टुकू माझ्याकडं कसा बघतोया
बाई, ह्यो भोळा कुडा, लई-लई साधा-भोळा
बाई, ह्यो भोळा कुडा, लई-लई साधा-भोळा

कशी समजावू त्याला, कशी समजावू?

कमळाची मी कळी गं, उभी अशी जळी गं
कमळाची मी कळी गं, उभी अशी जळी गं
हो, भुंगा बोलं ना का घुनूघुनू गं?
माझ्या बावळट गणोबाला काय म्हणू गं?
माझ्या बावळट गणोबाला काय म्हणू गं?

बघून तुला वाटं मला हात धरावा
रूपामंदी माझ्या-तुझ्या रंग भरावा
संगती फिरू असं, राजा-राणी जसं
संगती फिरू असं, राजा-राणी जसं

मन कसं दावू तुला, मन कसं दावू?

धागा अजून जुळं ना, मोका कसा मिळं ना?
धागा अजून जुळं ना, मोका कसा मिळं ना?
हो, मला पीसं त्याचं लागलं जणू गं
माझ्या बावळट गणोबाला काय म्हणू गं?
माझ्या बावळट गणोबाला काय म्हणू गं?



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link