Dhunyacha Dagud Dagdachi Pati

धुण्याचा दगुड, दगडाची पाटी
घे जरा पाटी, pencil हाती
पाटीवर लिवते मी ग, म, भ, न
दोघेजण जिरवू ग, म, भ, न

दोघेजण जिरवू ग, म, भ, न
मला येड लावलं या मास्तरनं
मला येड लावलं या मास्तरनं
ह्या-ह्या मास्तरनं, hey

ग, ग, ग, ग, ग गणपतीचा ग
शिकवतो पोरी तुला
नका मला शिकवू, नका मला चुकवू
ग हाय, हो ग माझ्या गालातला
ग माझ्या गालातला

(गालातला नव्हे, गणपतीतला)
(नव्ह-नव्ह गालातलाच)
(बरं आता म)

म, म, म, म, म, मकरातला म
शिकवतो पोरी तुला
नका मला हसवू, नका मला फसवू
म हाय, हो म माझ्या मनातला
म माझ्या मनातला

मी ज्ञान शिकते, मागं-म्होरं झुकते
तालावर बाई, मी धुते धूण
तालावर बाई, मी धुते धूण

मला येड लावलं या मास्तरनं
मला येड लावलं या मास्तरनं
ह्या-ह्या मास्तरनं, hey

भ, भ, भ, भ भडजीतला
न्हाई, न्हाई, न्हाई भ भवऱ्यातला
(भोवरा कुणाचा? पाण्याचा की बाईचा?)
(ज्यात फसाल त्याचा, अरे बापरे! आता न)

न, न, न, न नळातला
न्हाई, न्हाई, न्हाई न नखऱ्यातला
न नखऱ्यातला

धड्यावर धड त्यात थोडं-थोडं
मला काही सुचं ना खानं-पीनं

मला येड लावलं या मास्तरनं
मला येड लावलं या मास्तरनं
ह्या-ह्या मास्तरनं



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link