Kuni Sobtila Majhya

माझा वाडा नवा...
माझा वाडा नवा, गार सुटली हवा
त्यात एकली मी, त्यात धाकली मी
दार-खिडक्या तरी लावा

कुणी सोबतीला...
हो, कुणी सोबतीला माझ्या ऱ्हावा
हो, कुणी सोबतीला माझ्या ऱ्हावा
कुणी सोबतीला माझ्या ऱ्हावा
हो, कुणी सोबतीला माझ्या ऱ्हावा

आत वाकून या, डोळं झाकून या
गोल खांबावरी हात टेकून या, हात टेकून या
लाज लोकातली लाथ मारून अशी
दूर फेकून द्या, दूर फेकून द्या

रात आली भरून...
ओ, रात आली भरून, हात हाती धरून
रात आली भरून, हात हाती धरून
डोळं डोळ्यावरी लावा

कुणी सोबतीला...
हो, कुणी सोबतीला माझ्या ऱ्हावा
हो, कुणी सोबतीला माझ्या ऱ्हावा

आता अनमान का?
आता अनमान का? शेजवरती बसा
खुळ्या एकांतानं जीव झाला पीसा, जीव झाला पीसा
गोरा मुखडा धरून गालावरचं हसू
जरा हळू पुसा, जरा हळू पुसा

एवढं ऐका, धनी, ओ
एवढं ऐका, धनी, रात सरते सुनी
एवढं ऐका, धनी, रात सरते सुनी
दावा खुशालु द्या गावा

कुणी सोबतीला...
हो, कुणी सोबतीला माझ्या ऱ्हावा



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link