Tumhi Maza Bajirao - From "Vaijayanta"

माझ्यासाठी दिली राहुटी
इतरांना मज्जाव

तुम्ही माझे बाजीराव
तुम्ही माझे बाजीराव
तुम्ही माझे बाजीराव

मी मस्तानी, हिंदुस्तानी
बुंदेली पेहेराव
झिर-झिरवाणी निळी ओढणी
वाळ्याचा शिडकाव

तुम्ही माझे बाजीराव
तुम्ही माझे बाजीराव
तुम्ही माझे बाजीराव

तुम्ही मराठे, नव्हे छाकटे
अगदी सरळ स्वभाव
शूर शिपाई, तुमची द्वाही
चारी मुलखी नाव

तुम्ही माझे बाजीराव
तुम्ही माझे बाजीराव
तुम्ही माझे बाजीराव

उभी अंगलट, तांबुस फिक्कट
नयनी दाटला भाव
बोलावाचून, ख्यातीवाचून
अर्जी आविर्भाव

तुम्ही माझे बाजीराव
तुम्ही माझे बाजीराव
तुम्ही माझे बाजीराव

काल दुपारी भर दरबारी
उरी लागला घाव
मी पण चळले, तुम्हा भाळले
आता नाही निभाव

तुम्ही माझे बाजीराव
तुम्ही माझे बाजीराव
तुम्ही माझे बाजीराव

दिठी-दिठीचा नजरमिठीचा
होऊ द्याच सराव
या पायासी मज दासीसी
मिळेल का कधी वाव?

तुम्ही माझे बाजीराव
तुम्ही माझे बाजीराव
तुम्ही माझे बाजीराव



Credits
Writer(s): Vasant Pawar, G D Madgulkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link