Mi Ravikiranatun Aale Re

मी रविकिरणातून आले रे
मी रविकिरणातून आले रे
फुलाभोवती गाता-गाता...
फुलाभोवती गाता-गाता रंग उषेचे ल्याले रे

मी रविकिरणातून आले रे
मी रविकिरणातून आले रे, आले रे

तृणपात्याचा करून झुला रे...
तृणपात्याचा करून झुला रे झुलते वाऱ्यावरती
हळुच होतसे लाट निशेची ढळत्या प्राचीवरती

पहाट होता दवबिंदुचे...
पहाट होता दवबिंदुचे प्राक्तन मी झाले रे
मी रविकिरणातून आले रे
मी रविकिरणातून आले रे, आले रे

कुणी ओतिला गंध जुईचा माझ्या पंखावरती?
मला उमगली तुझी वेदना आगीहूनही जळती

कवाड उघडून हसले डोळे...
कवाड उघडून हसले डोळे, फुंकर मी झाले रे
मी रविकिरणातून आले रे
मी रविकिरणातून आले रे

फुलाभोवती गाता-गाता...
फुलाभोवती गाता-गाता रंग उषेचे ल्याले रे
मी रविकिरणातून आले रे
मी रविकिरणातून आले रे, आले रे



Credits
Writer(s): Mrinal Banerjee, Mohile Anil, Meena Khadikar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link