Gele Udun Rave

गेले उडून रावे...
गेले उडून रावे, फांदीस हेलकावे
आता कळ्या-फुलांनी सांगा कसे फुलावे?
गेले उडून रावे...

होता वसंत जेव्हा हलकेच शीळ आली
होता वसंत जेव्हा हलकेच शीळ आली
रंगीत पाखरांची...
रंगीत पाखरांची उतरून ओळ आली

आकाश ओळखीचे डोळ्यातुनी खुणावे
गेले उडून रावे...
गेले उडून रावे, फांदीस हेलकावे
आता कळ्या-फुलांनी सांगा कसे फुलावे?
गेले उडून रावे...

उलघाल जाणली मी कमळातल्या उन्हाची
उलघाल जाणली मी कमळातल्या उन्हाची
कोणासही कळे ना...
कोणासही कळे ना, हुरहुर चांदण्याची

ओढाळ पाखरा मी अजुनी किती झुरावे?
गेले उडून रावे...
गेले उडून रावे, फांदीस हेलकावे
आता कळ्या-फुलांनी सांगा कसे फुलावे?

गेले उडून रावे...
गेले उडून रावे...



Credits
Writer(s): Mrinal Banerjee, Mohile Anil, Meena Khadikar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link