Bai Mi Patang Udvit Hote (From "Lakhat Ashi Dekhni")

चढाओढीनं चढवित होते
हो, चढाओढीनं चढवित होते
गं बाई मी पतंग उडवित होते
गं बाई मी पतंग उडवित होते
पतंग उडवित होते, गं बाई मी पतंग उडवित होते

होता झकास सुटला वारा
वर पतंग ११-१२
होता झकास सुटला वारा
वर पतंग ११-१२
एकमेकांना अडवित होते
हो, एकमेकांना अडवित होते, हा, अडवित होते, हा, अडवित होते
बाई पतंग उडवित होते, गं बाई मी पतंग उडवित होते
पतंग उडवित होते, गं बाई मी पतंग उडवित होते

काटाकाटीस आला गं रंग
हसू फेसाळी घुसळीत अंग
काटाकाटीस आला गं रंग
हसू फेसाळी घुसळीत अंग
दैव हार-जीत घडवीत होते
हा, दैव हार-जीत घडवीत होते, हा, घडवीत होते, हा, घडवीत होते
बाई पतंग उडवित होते, गं बाई मी पतंग उडवित होते
पतंग उडवित होते, गं बाई मी पतंग उडवित होते

माझ्या दोऱ्यानं तुटला दोरा
एक पतंग येई माघारा
माझ्या दोऱ्यानं तुटला दोरा
एक पतंग येई माघारा
गेला गुंतत गिरवीत गोते
हो, गेला गुंतत गिरवीत गोते, हा, गिरवीत गोते, हा, गिरवीत गोते
बाई पतंग उडवित होते, गं बाई मी पतंग उडवित होते



Credits
Writer(s): G D Madgulkar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link