Pikala Jambhul Todu Naka (From "Bot Lavin Tithe Gudgulya")

गळला मोहर, झडली पालवी
फळे लागली निळी-जांभळी
वाह! वाह! गं माझी शुक्राची चांदणी

पिकलं जांभूळ तोडू नका
माझ्या झाडावरती चढू नका
हो, माझ्या झाडावरती चढू नका

मला चोरांची भीती लई वाटते
भर झोपेत दचकून उठते
गं बाई, बाई, बाई, बाई
चोरांची, या चोरांची

या-या चोरांची भीती लई वाटते
भर झोपेत दचकून उठते

घातलं कुंपण मोडू नका
कुणी झाडावरती चढू नका
हो, माझ्या झाडावरती चढू नका

झाड फळांच्या भारानी वाकलं
डाव्या बाजुला जरासं झुकलं
हो, झाड फळांच्या भारानी वाकलं
डाव्या बाजुला जरासं झुकलं

झुकल्या फांदीला ओढू नका
कुणी झाडावरती चढू नका
हो, माझ्या झाडावरती चढू नका

भारी पिरतीनं पानाआड जपलं
रस चाखाया लई जन टपलं
गं बाई, बाई, बाई, बाई
पिरतीनं, म्या पिरतीनं पानाआड जपलं
रस चाखाया लई जन टपलं

इश्काच्या माऱ्यानं पाडू नका
कुणी झाडावरती चढू नका
हो, माझ्या झाडावरती चढू नका



Credits
Writer(s): Raam Laxman, Rajesh Mazumdar, Dada Kondake
Lyrics powered by www.musixmatch.com

Link