Zatkun Tak Jeeva

झटकून टाक जीवा, दुबळेपणा मनाचा
झटकून टाक जीवा, दुबळेपणा मनाचा
फुलला पहा सभोवती...
फुलला पहा सभोवती आनंद जीवनाचा
झटकून टाक जीवा, दुबळेपणा मनाचा

होईल ताप काही मध्यान्हिच्या उन्हाचा
होईल ताप काही मध्यान्हिच्या उन्हाचा
अविचार सोड असला कोल्हाळ कल्पनांचा

आस्वाद घे सुखाने...
आस्वाद घे सुखाने येत्या नव्या क्षणाचा
झटकून टाक जीवा, दुबळेपणा मनाचा

पुष्पास वाटते का भय ऊन-पावसाचे?
पुष्पास वाटते का भय ऊन-पावसाचे?
आयुष्य त्यास आहे एकाच ना दिसाचे

हसुनी करी परि ते...
हसुनी करी परि ते वर्षाव सौरभाचा
झटकून टाक जीवा, दुबळेपणा मनाचा

का कालचा उद्याला देसी उगा हवाला?
का कालचा उद्याला देसी उगा हवाला?
द्यावाच वाटतो ना मग जीव दे जिवाला

अव्हेर काय करिसी...
अव्हेर काय करिसी अनमोल या तनाचा
झटकून टाक जीवा, दुबळेपणा मनाचा



Credits
Writer(s): N Dutta, G D Madgulkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link