Madhu Ithe An Chandra Tithe

मधू इथे अन चंद्र तिथे
झुरतो अंधारात, झुरतो अंधारात
अजब ही मधुचंद्राची रात

हाय, मधू इथे अन चंद्र तिथे
झुरतो अंधारात, झुरतो अंधारात
अजब ही मधुचंद्राची रात

एक चंद्र अन अगणित तारे
एक चंद्र अन अगणित तारे
दो हृदयांवर किती पहारे

हवी झोपडी, मिळे कोठडी
सरकारी खर्चात, सरकारी खर्चात
अजब ही मधुचंद्राची रात

मधू इथे अन चंद्र तिथे
झुरतो अंधारात, झुरतो अंधारात
अजब ही मधुचंद्राची रात

माहेराला सोडुन फसले
नशिबी आले सासर असले

ताटातुटीने सुरेख झाली
संसारा सुरवात, संसारा सुरवात
अजब ही मधुचंद्राची रात

मधू इथे अन चंद्र तिथे
झुरतो अंधारात, झुरतो अंधारात
अजब ही मधुचंद्राची रात

किती पाहुणे, किती निमंत्रित
किती पाहुणे, किती निमंत्रित
जमले सारे एका पंक्तीत

अशी निघाली लग्नानंतर
वाऱ्यावरती वरात, वाऱ्यावरती वरात
अजब ही मधुचंद्राची रात

हो, मधू इथे अन चंद्र तिथे
झुरतो अंधारात, झुरतो अंधारात
अजब ही मधुचंद्राची रात



Credits
Writer(s): N Dutta, G D Madgulkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link