He Chincheche Zaad

हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी
दिसशी तू, दिसशी तू, दिसशी तू, नवतरुणी काश्मिरी
हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी
दिसशी तू, दिसशी तू, दिसशी तू, नवतरुणी काश्मिरी
हे चिंचेचे झाड...

बघ निळसर पाणी झेलमचे झुळझुळे
हे गवत नव्हे गे, पिवळे केशर मळे
ही किमया केवळ घडते प्रीतीमुळे, प्रीतीमुळे

उघडे डोंगर आज हिमाचे मुकुट घालिती शिरी
दिसशी तू, दिसशी तू, दिसशी तू, नवतरुणी काश्मिरी
हे चिंचेचे झाड...

रुसलीस उगा का? जवळी ये ना जरा
गा गीत बुलबुला माझ्या चितपाखरा
हा राग खरा की नखऱ्याचा मोहरा, मोहरा?

कितीवार मी मरू, तुझ्यावर किती करू शाहिरी?
दिसशी तू, दिसशी तू, दिसशी तू, नवतरुणी काश्मिरी
हे चिंचेचे झाड...

हर रंग दाविती गुलाब गहिरे, फिके
तुज दाल सरोवर दिसते का लाडके?
पाण्यात तरंगे घरकुलसे होडके, होडके

त्यात बैसुनी मधुचंद्राची रात करू साजिरी
दिसशी तू, दिसशी तू, दिसशी तू, नवतरुणी काश्मिरी
हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी
दिसशी तू, दिसशी तू, दिसशी तू, नवतरुणी काश्मिरी
हे चिंचेचे झाड...

Credits
Writer(s): N Dutta, G D Madgulkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link