Ghanu Vaje Ghunghuna

घनु वाजे घुणघुणा, वारा वाहे रुणझुणा
घनु वाजे घुणघुणा, वारा वाहे रुणझुणा
भवतारकु हा कान्हा वेगीं भेटवा का?

चांदु वो चांदणे, चांपे वो चंदने
देवकीनंदनेविण नावडे वो
घनु वाजे घुणघुणा, वारा वाहे रुणझुणा

चंदनाची चोळी माझे सर्व अंग फोळी
चंदनाची चोळी माझे सर्व अंग फोळी
कान्हो वनमाळी वेगीं भेटवा का?
चंदनाची चोळी माझे सर्व अंग फोळी
कान्हो वनमाळी वेगीं भेटवा का?
घनु वाजे घुणघुणा, वारा वाहे रुणझुणा

सुमनाची सेज शितळ वो निकी
सुमनाची सेज शितळ वो निकी
पोळे आगीसारखे वेगीं विझवा का?
सुमनाची सेज शितळ वो निकी
पोळे आगीसारखे वेगीं विझवा का?
घनु वाजे घुणघुणा, वारा वाहे रुणझुणा

तुम्ही गातसां सुस्वरें ऐकोनि दावी उत्तरे
तुम्ही गातसां सुस्वरें ऐकोनि दावी उत्तरे
कोकिळें वर्जावें तुम्ही बाईयांनो
तुम्ही गातसां सुस्वरें ऐकोनि दावी उत्तरे
कोकिळें वर्जावें तुम्ही बाईयांनो
घनु वाजे घुणघुणा, वारा वाहे रुणझुणा

दर्पणीं पाहता रूप न दिसे हो आपुले
दर्पणीं पाहता रूप न दिसे हो आपुले
बाप रखुमादेवीवरें मज ऐसें केले
दर्पणीं पाहता रूप न दिसे हो आपुले
बाप रखुमादेवीवरें मज ऐसें केले
घनु वाजे घुणघुणा, वारा वाहे रुणझुणा



Credits
Writer(s): Sant Dnyaneshwar, Hridaynath Mangeshkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link