Dubhangun Jata Jata Mi Abhang Jhalo

दुभंगून जाताजाता मी अभंग झालो!
चिराचिरा जुळला माझा; आत दंग झालो!

सल जुनेच सलतासलता सुखावून गेले!
अन् हळूच गुणगुणती हे वळ न मोजलेले!
कशी कथा सरतासरता पूर्वरंग झालो!

किरण एक धरुनी हाती मी पुढे निघालो!
अन् असाच वणवणताना मी मला मिळालो!
सर्व संग सुटले, माझा मीच संग झालो!

ज्ञानदेव लिहुनी गेले ओळओळ भाळी!
निमित्तास माझे गाणे, निमित्तास टाळी!
तरू काय? इंद्रायणिचा मी तरंग झालो!



Credits
Writer(s): Ravi Daate, Suresh Bhat
Lyrics powered by www.musixmatch.com

Link