Rang Ola

रंगलेले स्वप्न माझे आज रंगात आले
हातात तुझ्या हात येता मन रंगीन झाले
इंद्रधनुष्याचे सात रंग, सारेच मनमोहक
कुणाला कुठला रंग आवडावा

हे ज्याच्या-त्याच्या आवडीवर निर्भर असते
नाही का? परंतु एक रंग असा असतो
की आयुष्यात तो एकदाच रंगतो
खुलतो, खुलवितो, मदमस्त करतो

हा रंग तिच्या हातावर बघून
तो म्हणतो, "रंगात रंगून जाण्याचा योग आज आला
दिवस आज मिलनाचा इंद्रधनूष्य झाला"

रंग ओला, रंग ओला
तुझ्या हाताच्या मेहंदीचा रंग ओला
रंग ओला, रंग ओला
तुझ्या हाताच्या मेहंदीचा रंग ओला

गोरा-गोरा हात तुझा मेहंदीने रंगला
गोरा-गोरा हात तुझा मेहंदीने रंगला
मेहंदीच्या रंगाने हात खुलला

रंग ओला, रंग ओला
तुझ्या हाताच्या मेहंदीचा रंग ओला
रंग ओला, रंग ओला
तुझ्या हाताच्या मेहंदीचा रंग ओला

हिरव्या-हिरव्या साडीने रूप खुलले
पिवळ्या-पिवळ्या हळदीने अंग खुलले
आ, हिरव्या-हिरव्या साडीने रूप खुलले
पिवळ्या-पिवळ्या हळदीने अंग खुलले

पायी पैंजण शोभती तुझ्या
बोलव रं हाती तुझ्या वरमाला

रंग ओला, रंग ओला
तुझ्या हाताच्या मेहंदीचा रंग ओला
रंग ओला, रंग ओला
तुझ्या हाताच्या मेहंदीचा रंग ओला

लाल-लाल अक्षदांचा डोईवर सडा
झाली नवरी तू वाजे चौघडा
लाल-लाल अक्षदांचा डोईवर सडा
झाली नवरी तू वाजे चौघडा

खळी गाली आली तू लाजता
ओठावरी तुझ्या गुलाब फुलला

रंग ओला, रंग ओला
तुझ्या हाताच्या मेहंदीचा रंग ओला
रंग ओला, रंग ओला
तुझ्या हाताच्या मेहंदीचा रंग ओला

गंध-गंध गजऱ्यांचा चोही दरवळे
रंग-रंग मेहंदीचा हाती खेळे
आ, गंध-गंध गजऱ्यांचा चोही दरवळे
रंग-रंग मेहंदीचा हाती खेळे

शृंगाराचा असा दीप नवा
अंगावरी तुझ्या कसा उजळला

रंग ओला, रंग ओला
तुझ्या हाताच्या मेहंदीचा रंग ओला
रंग ओला, रंग ओला
तुझ्या हाताच्या मेहंदीचा रंग ओला

गोरा-गोरा हात तुझा मेहंदीने रंगला
गोरा-गोरा हात तुझा मेहंदीने रंगला
मेहंदीच्या रंगाने हात खुलला

रंग ओला, रंग ओला
तुझ्या हाताच्या मेहंदीचा रंग ओला
रंग ओला, ला ला ला ला
तुझ्या हाताच्या मेहंदीचा ला ला ला ला

रंग ओला, ला ला ला ला
तुझ्या हाताच्या मेहंदीचा ला ला ला ला



Credits
Writer(s): Nandu Honap, Rajan Laakhe
Lyrics powered by www.musixmatch.com

Link