Tu Gelyaver

तू गेल्यावर...
तू गेल्यावर असे हरवले सूर, हरवले गाणे
तू गेल्यावर असे हरवले सूर, हरवले गाणे
वेलीवरचे फूल ठिबकले, हळवे दर्द दिवाणे

...हरवले गाणे
...हरवले गाणे
...हरवले गाणे
तू गेल्यावर...
तू गेल्यावर असे हरवले सूर, हरवले गाणे

शब्दांचा संभार आटला, गीतातून अंधार दाटला
शब्दांचा संभार आटला, गीतातून अंधार दाटला
पाण्यावर थरथरले अवचित मार्दव अश्रु तराणे

...हरवले गाणे
...हरवले गाणे
...हरवले गाणे
तू गेल्यावर...
तू गेल्यावर असे हरवले सूर, हरवले गाणे

पंखापरी फडफडल्या तारा, पानांतुन तडफडला वारा
पंखापरी फडफडल्या तारा, पानांतुन तडफडला वारा
इंद्रधनुचे रंग संपले उरले गंध विराणे

...हरवले गाणे
...हरवले गाणे
...हरवले गाणे
तू गेल्यावर...
तू गेल्यावर असे हरवले सूर, हरवले गाणे

हृदयाचे हुंकार कोपले, नयनांचे अभिसार लोपले
हृदयाचे हुंकार कोपले, नयनांचे अभिसार लोपले
प्रीतीलतेच्या हरित व्यथेचे गहिवरले नजराणे

...हरवले गाणे
...हरवले गाणे
...हरवले गाणे
तू गेल्यावर...
तू गेल्यावर असे हरवले सूर, हरवले गाणे

वेलीवरचे फूल ठिबकले, हळवे दर्द दिवाणे
...हरवले गाणे
...हरवले गाणे
...हरवले गाणे
...हरवले गाणे
...हरवले गाणे
...हरवले गाणे
...हरवले गाणे



Credits
Writer(s): Arun Paudwal, Santaram Nandgaonkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link