Mee Uga Kaateri

मी उगा काटेरी स्वप्ने पाहिली
बोचरी हुरहुर आता राहिली

धीर गेला पूर येता लोचनी
ठेव प्रीतीची अशी ही वाहिली

विसरले उध्वस्त करूनी मैफिली
मात्र ने ज्यांचीच गाणी गायली

दाखवाव्या कालच्या जखमा कुणा
शोधताहे आज जो तो सावली

चालता वाटेत होई भास हा
प्रिय माझी चीज मागे राहिली



Credits
Writer(s): Hemant Gayakwad, Vijay Joshi
Lyrics powered by www.musixmatch.com

Link